देवी भगवती रजस्वला होते, तीन दिवस योनीतून वाहतं रक्त


देवी भगवती रजस्वला होते, तीन दिवस योनीतून वाहतं रक्त

webdunia

देवीचे एकूण 51 शक्तिपीठे असून त्यातून एक देवी कामाख्‍या शक्तिपीठ आसामच्या गुवाहाटीहून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या निलांचल पर्वतावर आहे. या मंदिराचे तांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व आहे. येथे भगवतीची महामुद्रा योनी-कुंड यात स्थित आहे.

 
पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बूवाची पर्वाच्या दरम्यान देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भ गृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या जागी रक्त वाहते. हे रहस्यमयी विलक्षण तथ्य आहे. कामाख्या तंत्रानुसार श्लोकामध्ये याचे विवरण असे आहे-
योनी मात्र शरीराय कुंजवासिनि कामदा। रजोस्वला महातेजा कामाक्षी ध्येताम सदा॥ 
 
विशेष म्हणजे अम्बूवाची योग पर्व दरम्यान देवी भगवतीच्या गर्भगृहाची दारे आपोआप बंद होतात. या दरम्यान देवीचे दर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या पर्वात भगवतीच्या रजस्वला काळात गर्भगृहात स्थित महामुद्रेवर पांढरे कपडे अंथरले जातात. तीन दिवसाने पांढरा कपडा देवीच्या रजने रक्तवर्ण होतात. या वस्त्राचे तुकडे भक्तांना प्रसाद म्हणून देतात. तीन दिवसानंतर रजस्वला समाप्तीवर विशेष पूजा, अर्चना केली जाते. 
 
कहाणी
 
आख्यायिका अशी आहे की अहंकारी असुरराज नरकासुराला भगवती कामाख्येला आपली पत्नी करून घेण्याची इच्छा होती. तेव्हा देवीने त्याला सांगितले की एका रात्रीत तू नील पर्वताच्या चारही बाजूंना दगडाचे चार रस्ते तयार कर आणि मंदिरासोबत एक विश्राम गृहही तयार कर. तू हे पूर्ण करू शकलास तर मी तुझी पत्नी होईन आणि नाही करू शकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे. अहंकारी राक्षसाने सकाळ होण्यापूर्वी दगडाच्या पायऱ्यांचे रस्ते तर तयार केले पण विश्रामगृहाचे काम चालू असतानाच देवीने एका मायावी कोंबड्याच्या द्वारे सकाळ झाल्याचे सूचित केले ज्यामुळे रागावलेल्या नरकासुराने त्याचा पाठलाग केला. ब्रह्मपुत्रेच्या दुसऱ्या तीरावर पोचलेल्या असुराने त्या कोंबड्याला मारले. हे ठिकाण आजही कुक्टाचकि नावाने प्रसिद्ध आहे. नंतर देवी भगवतीच्या मायेमुळे विष्णूने नरकासुराचा वध केला. 
 
आद्यशक्ती महाभैरवी कामाख्येचे तीर्थ हे जगातील सर्वोच्च कौमारी तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे या शक्तिपीठाच्या ठिकाणी कुमारी पूजनाचे अनुष्ठानही महत्त्वाचे मानले जाते.सर्व कूलातील आणि वर्णांतील कुमारिका या आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जातात. यामध्ये जातिभेद पाळला जात नाही. असा भेद पाळल्यास साधकाची सिद्धी नाहीशी होते.


Comments

Popular posts from this blog

पंचकन्या

तपती

ऋषभदेव का त्याग