देवी भगवती रजस्वला होते, तीन दिवस योनीतून वाहतं रक्त
देवी भगवती रजस्वला होते, तीन दिवस योनीतून वाहतं रक्त देवीचे एकूण 51 शक्तिपीठे असून त्यातून एक देवी कामाख्या शक्तिपीठ आसामच्या गुवाहाटीहून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या निलांचल पर्वतावर आहे. या मंदिराचे तांत्रिक शास्त्रात विशेष महत्त्व आहे. येथे भगवतीची महामुद्रा योनी-कुंड यात स्थित आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार अम्बूवाची पर्वाच्या दरम्यान देवी भगवती रजस्वला होते आणि तिच्या गर्भ गृहातील योनीतून सलग तीन दिवस जल प्रवाहाच्या जागी रक्त वाहते. हे रहस्यमयी विलक्षण तथ्य आहे. कामाख्या तंत्रानुसार श्लोकामध्ये याचे विवरण असे आहे- योनी मात्र शरीराय कुंजवासिनि कामदा। रजोस्वला महातेजा कामाक्षी ध्येताम सदा॥ विशेष म्हणजे अम्बूवाची योग पर्व दरम्यान देवी भगवतीच्या गर्भगृहाची दारे आपोआप बंद होतात. या दरम्यान देवीचे दर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या पर्वात भगवतीच्या रजस्वला काळात गर्भगृहात स्थित महामुद्रेवर पांढरे कपडे अंथरले जातात. तीन दिवसाने पांढरा कपडा देवीच्या रजने रक्तवर्ण होतात. या वस्त्राचे तुकडे भक्तांना प्रसाद म्हणून देतात. तीन दिवसानंतर रजस्वला समाप्तीवर विशेष पूजा, अर्चना केली ज...